सीझर, ज्यूलिअस गेयस
सीझर, ज्यूलिअस गेयस : (१२ किंवा १३ जुलै १००— ४४ इ. स. पू.). ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म रोम शहरी झाला; मात्र नेमक्या कोणत्या साली झाला याबद्दल वाद आहेत.